महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन उन्हाळ्यात हर्णे, पाजपंढरीत साथीच्या रोगांचा फैलाव; ३४ जणांना लागण, १४ रुग्णांवर उपचार सुरू

दापोली तालुक्यातील हर्णे, पाजपंढरी परिसरात टायफॉईड, व्हायरल व डेंग्यू तापाची साथ ऐन उन्हाळ्यात पसरल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये परिसरातील तब्बल ३४ जणांना याची लागण झाली होती. मात्र, यातील १४ जण अद्याप दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर डेंग्यू झालेल्या एका रुग्णाला मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

By

Published : May 11, 2019, 7:41 PM IST

ऐन उन्हाळ्यात हर्णे,पाजपंढरीत साथीच्या रोगांचा फैलाव

रत्नागिरी- दापोली तालुक्यातील हर्णे, पाजपंढरी परिसरात टायफाईड व डेंग्यूची साथ पसरली असून १४ रुग्णांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एका रुग्णाला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, दूषित पाणी आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही साथ पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ऐन उन्हाळ्यात हर्णे,पाजपंढरीत साथीच्या रोगांचा फैलाव

दापोली तालुक्यातील हर्णे, पाजपंढरी परिसरात टायफॉईड, व्हायरल व डेंग्यू तापाची साथ ऐन उन्हाळ्यात पसरल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये परिसरातील तब्बल ३४ जणांना याची लागण झाली होती. मात्र, यातील १४ जण अद्याप दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर डेंग्यू झालेल्या एका रुग्णाला मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, ही साथ कशामुळे झाली याची शहानिशा करण्यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून दोन पथक नेमण्यात आली आहेत. पाण्याचे नमुने घेऊन घरोघरी भेट देऊन पाहणी करण्याचे काम हे पथक करत आहे. आरोग्य विभागाकडून आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्याचे कामही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतकडून केला जाणारा पाणी पुरवठयाची स्वच्छता व फिरते खाद्यपदार्थ यामुळे ही साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यामध्ये हंसिका अनिल रघुवीर(९), कुंदन काशिनाथ पावसे(४), राजेंद्र रामा चोगले (४०), रिंकी दिनेश यादव(३०), विदुला परशुराम चोगले(१६), ज्योती किरण कुलाबकर (४०), अनुज अनिल रघुवीर(५), कौशिक अंकुश पावसे(१२), ऋतिका गजानन रघुवीर(८), दर्शन दत्ताराम पावसे(७), कृतिका दत्ताराम पावसे(९), संचित गजानन पाटील(८), आदिती काशिनाथ पावसे(९), योगेश दामोदर पावसे(२८), शंकूतला तबीब(६४), भावदिप कैलास पावसे(६), कौस्तुभ लीलाधर चोगले(१५), रवींद्र हरिशचंद्र चोगले(३), मोरेश्वर मधुकर चोगले(१५) या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तरी पुढील रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. यामध्ये निहाल सागर पावसे(५), नियती सोमनाथ पावसे(१०), कश्मी कैलास पावसे(३), परी जयकुमार वर्मा(६), जिग्नेश ज्ञानेश्वर पावसे(९), प्रांजल सागर पावसे(४), विराज प्रकाश पावसे(१३), निवेदन महेंद्र पाटील(७), जानकी लक्ष्मण पाटील(४५), सुप्रिया मारुती चोगुले(२२), ऋतिक गजानन रघुवीर(८), प्राजक्ता बाळकृष्ण पावसे(१७), रणजित चंद्रकांत रघुवीर(२७) यांचा समावेश आहे. तर श्लोक विष्णू पावसे याला डेंग्यूसदृश्य ताप असल्याने अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, हर्णै व पाजपंढरी ही गावे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहेत. हर्णैमध्ये २००७ मध्ये आशाच स्वरूपाची साथ पसरली होती. तसेच २००९ मध्ये देखील चिकूनगुण्याची साथ आली होती. यादृष्टीने आरोग्यखात्याकडून सतर्क राहणे गरजेचे आहे. पूर्वी घरोघरी आरोग्य खात्याचे कर्मचारी फिरून ताप, सर्दी, खोकला तसेच घरात कोणी आजारी आहे का? याची चौकशी करून जात असत व त्याची नोंद घराच्या मुख्य दरवाजावर होत असे, परंतु आता आरोग्य कर्मचारी येतच नाही. त्यामुळे याकडे आरोग्यखात्याने वेंळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. हर्णै, पाजपंढरीतील साथीचे रुग्ण दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजताच महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटीचे सदस्य योगेश कदम यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णांना भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details