रत्नागिरी -कोरोनामुळे बंद करण्यात आलेली वाचनालये तब्बल 7 महिन्यानंतर गुरुवारी सुरू झाली आहेत. वाचनालये सुरू झाल्यामुळे वाचक, सभासदांना आनंद झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी वाचकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन, वाचक वाचनालयाला भेट देताना दिसून येत आहेत.
वाचनालये सुरू झाल्याने वाचकांमध्ये उत्साही वातावरण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतायत खबरदारी - CORONA
कोरोनामुळे बंद करण्यात आलेली वाचनालये तब्बल 7 महिन्यानंतर गुरुवारी सुरू झाली आहेत. वाचनालये सुरू झाल्यामुळे वाचक, सभासदांना आनंद झाला आहे. रत्नागिरीच्या जिल्हा नगर वाचनालयातही असेच उत्साही वातावर पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन, वाचक वाचनालयाला भेट देताना दिसून येत आहेत.
रत्नागिरीच्या जिल्हा नगर वाचनालयातही असेच उत्साही वातावर पहायला मिळाले. आज वाचकांसाठी आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याांनी 8 दिवसांपूर्वी वाचनालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर बुधवारी प्रत्यक्ष आदेश निघाले, आणि काल गुरुवारपासून वाचनालये सुरू झाली आहेत. वाचन प्रेरणा दिनापासून परत वाचनालये वाचकांसाठी खुली झाली. त्यामुळे वाचकांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच वाचनालयात सोशल डिस्टन्ससिंग, सॅनिटायझर, मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.