रत्नागिरी : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला मंगळवारी संध्याकाळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
चिपळूणच्या स्वच्छतेसाठी 2 कोटींचा निधी, मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - 2 crore for sanitation in chiplun
चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला मंगळवारी संध्याकाळी त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटविण्यासाठी साधने आणि मनुष्यबळही गरजेचे आहे. यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधन सामुग्रीसह पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं. चिपळूण शहराला वशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकाऱ्यांना केली. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -सरकारचे नियोजन नसल्यानेच आपत्ती काळात जीवितहानी, तर आणखी दुर्घटना होऊ शकतात - राज ठाकरे