रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. आज (रविवार) आणखी 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. संध्याकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले. यातील चौघे संगमेश्वरमधील असून त्यांची प्रवास हिस्ट्री मुंबई आहे, तर रत्नागिरी तालुक्यात 4 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील एका नर्सचा समावेश आहे. दरम्यान, आज पुन्हा 8 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज 8 कोरोनाबाधित आढळले, कोरोनाबाधितांची संख्या 42 - रत्नागिरी कोरोना आकडेवारी
दरम्यान, यापूर्वी 5 जण कोरोनामुक्त झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबईतून येणारे सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी कोरोनाचे 13 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आज पुन्हा 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील संगमेश्वरमधील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे स्वॅब 9 मे 2020 रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यातील दोन जण चेंबुर येथून आले असून एक जण कांदिवली येथून तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रत्नागिरी तालुक्यातही 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये जिल्हा रुग्णालयातील एका नर्सचा समावेश आहे. असे 8 जण नवीन कोरोना रुग्ण आज जिल्ह्यात सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 36 झाली आहे. दरम्यान, यापूर्वी 5 जण कोरोनामुक्त झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबईतून येणारे सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.