रत्नागिरी -मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला दिला होता हे मला माहीत नाही. परंतु, एखादे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर न्यायालयाने दिलेला हा निर्णय आहे. ज्यावेळी महानगर पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली, त्यावेळी आम्ही कोर्टात गेलो नव्हतो. (Dussehra gathering of Shiv Sena ) समोरची लोक कोर्टात गेली होती. त्याच्यानंतर सदा सरवनकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली होती. त्यावर तो कोर्टाचा निकाल आलेला आहे असं उदय सामंत म्हणाले आहेत.
नैसर्गिक युती - सध्या सहानुभूतीचं राजकारण करण्यापेक्षा किंवा सहानुभूती मिळत आहे. परंतु, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विचार शिवतीर्थावरून काय जायचा, तर काँग्रेस आणि तत्सम जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाडी कधी करायची नाही, जो नैसर्गिक युतीचा पक्ष आहे त्याच्याबरोबर युती करून राजकारण करायचे हाच विचार शिवाजी पार्कवरून बाळासाहेबांनी दिला आहे. तो विचार पाठीमागे पडत चालल्यामुळे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार आणि आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे तो देखील मेळावा बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा मेळावा होत आहे असही ते म्हणाले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातला शिवसेनेचा सर्वात मोठा मेळावा वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेचा असणार आहे असही उदय सामंत म्हणाले आहेत.