महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 19, 2020, 3:38 PM IST

Updated : Oct 19, 2020, 4:08 PM IST

ETV Bharat / state

ग्रामदैवतांचा नवरात्रौत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा

कोकणातील ग्रामदैवतांच्या मंदिरातील नवरात्रौत्सवाला विशेष महत्त्व असते. यावर्षी नवरात्रौत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे.

महालक्ष्मीचे प्रतिरुप
महालक्ष्मीचे प्रतिरुप

रत्नागिरी -कोकणातील ग्रामदैवतांच्या मंदिरातील नवरात्रौत्सवाला विशेष महत्त्व असते. यावर्षी नवरात्रौत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे दरवर्षी या सणाला गजबजणाऱ्या मंदिरांमध्ये यावर्षी मात्र शांतता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये हीच स्थिती आहे.

मंदिरातील दृश्य

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरुप समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील काजरघाटी मंदिरात देखील नवरात्रौत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. श्री महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्य्रांबरी या तीन देवींचे येथे मंदिर आहे. काजरघाटीची ही ग्रामदैवता आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. 300 वर्षांपासूनची या मंदिरातील उत्सवाची परंपरा अद्यापही अखंडित आहे. श्री महालक्ष्मीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटींचे पालन करून धार्मिक विधी केल्या जात आहेत. मात्र, दरवर्षी गजबजलेल्या या मंदिरात यावर्षी मात्र आता शांतता पहायला मिळत आहे.

हेही वाचा -'मास्कच सध्या एकमेव लस.. रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मदत करणार'

Last Updated : Oct 19, 2020, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details