महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत तीन ठिकाणी घेण्यात आले कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' - रत्नागिरी ताज्या बातम्या

जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा या तीन ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली. कोरोना लस आल्यावर ज्यांना ही लस द्यायची आहे, यासाठी ही रंगीत तालीम होती.

dry run corona vaccination Successfuly conducted at three places in ratnagiri
रत्नागिरीत तीन ठिकाणी घेण्यात आले कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' यशस्वी

By

Published : Jan 8, 2021, 10:42 PM IST

रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्यातदेखील कोरोना लसीची ड्रायरन झाली. जिल्हा शासकीय रुग्णालय दापोली उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा आदी ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली. कोरोना लस आल्यावर ज्यांना ही लस द्यायची आहे, यासाठी ही रंगीत तालीम होती.

ड‌ॉक्टरांची प्रतिक्रिया

तीनही ठिकाणी प्रत्येकी 25 लाभार्थ्यांची निवड -

कोरोनाला लगाम घालण्यासाठी देशातील काही कंपन्यांनी लसी तयार केल्या असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यामध्येही यासाठी प्रशासन सज्ज असून आज ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र व दापोली उपजिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. तीनही ठिकाणी प्रत्येकी 25 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

प्रशासन कोरोना लसीकरणासाठी सज्ज -

ड्राय रन दरम्यान लस दिली गेली नसली, तरी हे प्रात्यक्षिक होते. लसीकरण सुरु झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणाहून मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी दरदिवशी शंभर जणांना लसीकरण केले जाणार आहे. सध्या जिल्हा आरोग्य प्रशासन कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनादेखील लसीकरण करण्याकरिता कोणताही त्रास होणार नाही, याबाबत योग्य ती खबरदारी घेतल्याचे त्यांंनी म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस -

दरम्यान, लसीकरणाला ज्यावेळी खर्‍या अर्थाने सुरुवात होईल, त्यावेळी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सरकारी व खासगी मिळून 14 हजार आरोग्यसेवकांना ही लस दिली जाणार आहे. यामध्ये रुग्णालयातील डॉक्टरपासून परिचारिका ते शिपायापर्यंतचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात कोरोनाकाळात आघाडीवर असणार्‍या पोलीस व महसूल विभागातील कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षावरील व्यक्‍तींना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्येही 50 ते 60 व 60 वर्षावरील, असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. तिसर्‍या टप्प्यात 18 ते 50 वर्षाखालील व्यक्‍तींना ही लस दिली जाणार आहे. यामध्ये लसीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली आहे.

हेही वाचा - २ तासाच्या चौकशीनंतर कंगना रणौत पोलीस स्टेशनमधून बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details