महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनसाठी रत्नागिरीत ड्रोन कॅमेऱ्याची नजर - रत्नागिरी कोरोना बातमी

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ३ जूनपासून सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्याकाळात केवळ ' अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे.

रत्नागिरी शहर
रत्नागिरी शहर

By

Published : Jun 5, 2021, 8:29 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. पोलिसांकडूनही या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शहरात बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून , नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

ड्रोन कॅमेऱ्याची नजर
ड्रोन कॅमेऱ्याची मदतजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ३ जूनपासून सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्याकाळात केवळ ' अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्याचबरोबर विविध भागांत पेट्रोलिंगही सुरू आहे. मात्र, शहराची व्याप्ती पाहता शहरातील अंतर्गत मार्गावर लक्ष ठेवणे कठीण जात आहे या छुप्या मार्गांचा वापर करून नागरिक घराबाहेर पडत आहेत. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी रत्नागिरी शहरात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलीस दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याचे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस कॉन्स्टेबल नरेश नवले उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details