रत्नागिरी - कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी सध्या डॉल्फिनचे दर्शन होत आहे. रत्नागिरीतील मिऱ्या, नेवरे, काजिरभाटी, काळबादेवी किनारी डॉल्फिनचा वावर सुरू झाला आहे.
डॉल्फिनचा वावर ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. समुद्राच्या निळ्याशार पाण्यातील ठिकाणी डॉल्फिनचे दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले आहे. डॉल्फिनचे वास्तव्य आणि दर्शन कोकणच्या पर्यटनात भर घालणारे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचे दर्शन समुद्रकिनारी डॉल्फिनच्या झुंडीसध्या अनेकांना दिवाळीच्या सुट्ट्या असताना समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर डॉल्फिनच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. पर्यटकांसाना समुद्र किनाऱ्यावर उभे राहून डॉल्फिन न्याहाळण्याचा आनंद वेगळाच असतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेली सजीवसृष्टी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो. गुहागर, हर्णे, मुरुड, कर्दे, दापोलीसह रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या काळबादेवी, नेवरे, आरे वारे जवळ डॉल्फिनच्या झुंड पाहायला मिळतात. हा मासा शांत असून तो पाण्यातून पोहत जाताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
पर्यटकांना त्रास नाही
डॉल्फिनचा पर्यटकांना कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक किनाऱ्यावर सकाळच्या सत्रात गर्दी करतात. वातावरणातील उष्मा वाढला की मासे खोल पाण्याकडे वळतात. अनेक होडीवाले हे मासे पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन समुद्रात जातात. थंडी सुरू झाली की डॉल्फिन मासा मोठ्या प्रमाणात समुुद्रकिनारी दिसू लागतो.
डॉल्फिनच्या दर्शनची हा काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचे दर्शन झाले आहे.
दरम्यान, पालघरमधील वैतरणा खाडीत कधीही न दिसणाऱ्या डॉल्फिन माशांची झुंड एप्रिलमध्ये दिसली होती. वैतरणा येथील एका मच्छीमाराने डॉल्फिनच्या या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.