रत्नागिरी - जिल्ह्यात समुद्र किनारी डॉल्फिनचे दर्शन घडले आहे. भगवती बंदर परिसरात सध्या डॉल्फिनचे थवेच्या थवे मुक्त संचार करताना आढळत आहेत. डॉल्फिन या ठिकाणी पाण्यात उड्या देखील मारत असल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळत आहे.
कोकण आणि तेथील अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचं आकर्षण असते. मात्र, किनाऱ्याप्रमाणे अनेकांना या समुद्राच्या पोटात काय दडले आहे? याचे कुतुहल असते. त्यामुळे अनेक पर्यटक कोकणाची वाट धरतात. मात्र, सध्या येथील किनाऱयांवर देखण्या आणि सुरेख अशा डॉल्फिनचे दर्शन घडत आहे.