महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2020, 9:03 AM IST

ETV Bharat / state

दापोली समुद्र किनाऱ्यावर डॉल्फीनला जीवनदान देण्यात तरुणांना यश

दापोलीच्या समुद्रकिनारी पाण्याशिवाय तडफडणाऱ्या डॉल्फीनला जीवनदान देण्यात स्थानिक तरुणांना यश आले आहे. दापोलीतील लाडघर समुद्र किनाऱ्यावर एक डॉल्फीन अडकला होता.

dolphin
दापोलीत किनाऱ्यावर आलेल्या डॉल्फीनला जीवनदान देण्यात तरुणांना यश

रत्नागिरी -दापोलीच्या समुद्रकिनारी पाण्याशिवाय तडफडणाऱ्या डॉल्फीनला जीवनदान देण्यात स्थानिक तरुणांना यश आले आहे.
दापोलीतील लाडघर समुद्र किनाऱ्यावर एक डॉल्फीन अडकला होता. भलामोठा डॉल्फीन पाण्याविना जणू शेवटची घटका मोजत होता. ही बाब इथल्या तरुणांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ या डॉल्फीनला उचलून सुरक्षित पाण्यात सोडले.

पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर हा डॉल्फीन समुद्रात झेपावला आणि काही क्षणात दिसेनासा झाला. भरतीच्या वेळी हा डॉल्फीन किनाऱ्यावर आला असावा आणि जेव्हा ओहटी लागली तेव्हा तो किनाऱ्यावर अडकला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन -

मागील वर्षी भुईगाव येथील सुरूची बाग परिसरात किनाऱ्यावर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना एक मृत डॉल्फीन मासा वाहून आलेला आढळला. पाच फूट लांब असलेल्या या डॉल्फीनचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details