महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट, आज तब्बल 417 जण कोरोनाबाधित - ratnagiri corona update

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट आहे. जिल्ह्यात तब्बल417 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी

By

Published : Apr 15, 2021, 7:57 PM IST

रत्नागिरी - मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात जिल्ह्यात सापडले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 417 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या 417 पैकी 338 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 79 रुग्ण अ‌ॅन्टिजेन चाचणी केलेले आहेत.

आलेख चढाच -

जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चढाच आहे. सुरुवातीला 100पेक्षा जास्त, त्यानंतर 200पेक्षा जास्त, नंतर गेले तीन दिवस 300पेक्षा जास्त आणी आज तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल 400च्या पुढे गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एवढे रुग्ण सापडले आहेत, तेवढे आज सापडले आहेत. आज तब्बल 417 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. 417 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 14 हजारापार पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 14 हजार 38 वर जाऊन पोहोचली आहे. आज आलेल्या अहवालात 338 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 79 रुग्ण अ‌ॅन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

6 जणांचा मृत्यू -

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दापोली तालुक्यात 2, लांजा, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 421वर जाऊन पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details