रत्नागिरी : धोपेश्वर रिफायनरीसंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी एक मोठ विधान केले आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण ( Big Statement Regarding Dhopeshwar Refinery ) पाहिजे ते पॅकेज स्थानिकांना देऊ, स्थानिकांच्या शंका आम्ही नक्की दूर करू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन, व्यवसाय करण्यास सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ( Conference was Inaugurated by Uday Samant ) झाले.
Uday Samant Refinery : रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठं विधान; म्हणाले 'आपण पाहिजे ते पॅकेज देऊ' - कोकणातील रत्नागिरीमधील रिफायनरी प्रकल्प
कोकणातील रत्नागिरी येथील गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी स्थानिकांना रिफायनरी प्रकल्पासंबंधी आश्वस्त केले आहे. या प्रकल्पाने घरोघरी रोजगावाढीची संधी मिळेल ( Big Statement Regarding Dhopeshwar Refinery ) त्यामुळे हा प्रकल्प रत्नागिरीत यावा, याकरिता स्थानिकांना हवे ते पॅकेज आपण देऊ असे सांगितले आहे. तसेच त्यांच्या शंका आपण दूर करू, ( Conference was Inaugurated by Uday Samant ) असे सांगितले आहे.
रिफायनरी प्रकल्पाने घराघरात रोजगार मिळेल :यावेळी सामंत म्हणाले की, रिफायनरी प्रकल्पाला एकीकडे शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. स्थानिक आमदारांचा विरोध नाही, खासदारांचा काहीतरी गैरसमज असू शकतो, मग नक्की विरोध कोणाचा आहे, हे शोधून काढले पाहिजे. तसेच रिफायनरी प्रकल्प आला तर जिल्ह्यातील घराघरात रोजगार मिळेल, असे सामंत यावेळी म्हणाले.
रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवला जातोय :दरम्यान, कोकणात प्रकल्प आला की त्याला विरोध होतो, अशी नकारात्मक मानसिकता उद्योजकांमध्ये पसरलेली आहे. ती पुसण्याची गरज आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबतही तसाच गैरसमज पसरवला जातोय. या प्रकल्पाचे युनिट चंद्रपूरला गेले, असे सांगितले जात होते. पण तसा काहीच प्रश्न नाही. रिफायनरीबाबतचे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.