रत्नागिरी -विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (दि. 20 मे) जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. खेड तालुक्यातील बोरजनंतर त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे भेट दिली. तेथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या समस्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्या. स्थानिक आमदारांकडून कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात नाही, अशी तक्रारही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवळी गावाला भेट देत केली नुकसानीची पाहणी - Ratnagiri district news
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागाची पाहणी केली.
पाहणी करताना फडणवीस व अन्य
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -वादळाने मोठं नुकसान, मात्र प्रशासन अनेक ठिकाणी कमी पडतंय - निलेश राणे
Last Updated : May 20, 2021, 7:16 PM IST