महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारने कोकणसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis press conference at Shrivardhan

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवार) निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर रायगड येथे आले. यावेळी त्यांनी अलिबाग, मुरड, पेण श्रीवर्धन या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर श्रीवर्धन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

Devendra Fadnavis Konkan visit
देवेंद्र फडणवीस कोकण दौैरा

By

Published : Jun 11, 2020, 8:11 PM IST

रायगड - महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून यामध्ये छोटे व्यापारी, बागायतदार, नुकसानग्रस्त यांच्या हाताशी काहीच लागणार नाही. चक्रीवादळ होऊन 9 दिवस झाले. तरिही जाहीर केलेल्या तातडीच्या मदतीचा एकही रुपया नागरिकांपर्यंत अद्याप पोहोचला नाही. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यातही प्रशासन आणि शासन अपुरे पडले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवार) निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर रायगड येथे आले होते. यावेळी त्यांनी अलिबाग, मुरड, पेण श्रीवर्धन या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर श्रीवर्धन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

श्रीवर्धन येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद...

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारने नुकसानीचे निकष बदलावेत आणि लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. वीजपुरवठा सुरळीत करणे याला प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. केंद्राकडून नुकसानग्रस्त कोकणासाठी मदत मिळवण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा...'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी'

निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची बागायती शेती नष्ट झाली आहेत. त्यामुळे येथील बागायतदार हा पूर्णतः कोलमडून गेला आहे. अशावेळी शासनाने नुकसानीचे नियम आणि निकष बदलून नुकसानग्रस्तांना मदत केली पाहिजे. झाडे पडून घरांचे, वीज वितरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करणे महत्वाचे आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे ते सुद्धा लवकरात लवकर करावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून 100 कोटी जाहीर केली असली. तरीही आद्याप त्यातील एक रुपया नुकसानग्रस्तांना मिळालेला नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

महाविकास आघाडीने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे. यात बागायतदार शेतकऱ्याला गुंठ्याला फक्त एक हजार मिळणार असूनत्याची क्रूर चेष्टा शासनाने केली आहे. घर बांधणीसाठी दीड लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली, तरिही ही मदत कमी आहे. त्याऐवजी पंतप्रधान आवास आणि राज्य सरकार याचा निधी दिला, तर शहरी भागात साडेतीन लाख तर ग्रामीण भागात अडीच लाख मिळू शकतात.

हेही वाचा...चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना अधिकची मदत मिळावी; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शरद पवारांची सूचना

श्रीवर्धनमध्ये वादळाने बेघर झालेल्या नागरिकांना एसटी स्टँडवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पावसात भिजावे लागत आहे. अशा नागरिकांना मंगल कार्यालये अथवा इतर हॉल ठिकाणी सुरक्षित ठेवणे गरजेचे होते, याबाबत प्रशासनअपुरे पडले असल्याची टीका फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केली.

पर्यटन क्षेत्राला देखील उभारी देण्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मच्छिमार बांधव देखील चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना यामुळे आधीच कोलमडून गेला आहे. तरिही पर्यटन आणि मच्छीमारांसाठी कोणतीही मदत शासनाने प्रत्यक्ष जाहीर केली नसून त्यांनाही केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेतून उभारी देण्यासाठी मदत करणे गरजेचे असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details