नंदूरबार - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आज जोरदार टीका केली. भिक नको पण कुत्रा आवर असे म्हणत फडणवीस यांनी सरकारच्या १० रुपयात जेवण या सरकारच्या योजनेची खिल्ली उडवली. तसेच या सरकारने शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तेही हवेतच विरले. त्यामुळे महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा या सरकारच्या नवा उद्योग असल्याचे फडणवीस म्हणाले.
१० रुपयात जेवण या सरकारी योजनेची फडणवीसांनी उडवली खिल्ली - १० रुपयात जेवन या सरकारी योजनेची फडणवीसांनी उडवली खिल्ली
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आज जोरदार टीका केली. भिक नको पण कुत्रा आवर असे म्हणत फडणवीस यांनी सरकारच्या १० रुपयात जेवण या सरकारच्या योजनेची खिल्ली उडवली.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ फडणवीस नंदूरबारमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 10 रुपयात किती लोकांना भोजन याचे जिल्हानिहाय आकडेच दिले जात आहेत. संपूर्ण नंदूरबार जिल्ह्यांतून केवळ 300 लोकांनाच हे जेवण मिळू शकणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
मलाई खाण्यासाठी तीन लोक एकत्र -
महाविकास आघाडीतील हे ३ लोक मलाई खाण्यासाठी एकत्र आले असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. हे सरकार विश्वासघाताने तयार झाले आहे. त्यामुळे ते जास्त दिवस टिकणार नाही. या सरकारला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.