महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के, मृत्यूदर राज्यापेक्षाही जास्त - corona deaths ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यात १८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. एप्रिल महिन्यात ही संख्या ६ होती. मात्र, त्यानंतर नियम थोडे शिथिल झाल्याने अनेकांनी आपल्या जिल्ह्यातील गावाकडे धाव घेतली. मात्र, अनेक जण चाचणी न करताच आले. त्यामुळे, जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली. सप्टेंबर महिन्यात ही संख्या जास्तच वाढली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Nov 2, 2020, 8:23 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या आता कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जवळपास ३.७३ टक्के एवढे आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्यापेक्षाही जास्त आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे.

५७ हजार ४६९ जणांची कोरोना तपासणी

रत्नागिरी जिल्ह्यात १८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. एप्रिल महिन्यात ही संख्या ६ होती. मात्र, त्यानंतर नियम थोडे शिथिल झाल्याने अनेकांनी आपल्या गावाकडे धाव घेतली. मात्र, अनेक जण चाचणी न करताच आले. त्यामुळे, जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढू लागली होती. सप्टेंबर महिन्यात ही संख्या जास्तच वाढली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ४६९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यातून ८ हजार ४६९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर

बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के

जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ९०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के एवढे आहे. तर, सध्या होम आयसोलेशनमध्ये २२ जण आहेत. तर सध्या अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १३५ आहे.

मृत्यू दर 3.73 टक्के

जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यापेक्षाही जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ३.७३ टक्के एवढा आहे. मृतांमध्ये ४० ते ६० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये इतर आजार असलेले रुग्ण म्हणजेच हृदयरोग, डायबेटीस, रक्तदाब, किडनीचे आजार असलेल्यांची संख्या मोठी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

दरम्यान, मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमाचीही कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानामुळे वेळेवर आजाराचे निदान होत आहे. त्यामुळे, मृत्यूदर आणखी कमी होत असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली.

सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात

रत्नागिरी - ८७, चिपळूण - ७४, खेड - ५०, संगमेश्वर - ३३, दापोली - ३२, राजापूर - १४, गुहागर - १२, लांजा - ११, मंडणगड - ३.

आरोग्य तपासणीसाठी ३ हजार ३८४ जणांचे पथक

जिल्ह्यात आरोग्य तपासणीसाठी ३ हजार ३८४ जणांचे पथक कार्यरत असून, २ हजार ९७० पर्यवेक्षक आहेत. आतापर्यंत ४ लाख ३२ हजार ६१७ लोकांची तपासणी करण्यात आली असून यात ४ हजार सारीचे रुग्ण सापडले आहेत. तर, जिल्ह्यात सध्या ७६ अ‌ॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

हेही वाचा-रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स अन् केटरर्स असोसिएशनचे एकदिवसीय धरणे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details