महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ratnagiri Crime News: बॉम्ब तयार करणारे रॅकेट? पालगडमध्ये माथेफिरूकडून तब्बल 20 गावठी बॉम्ब जप्त, दापोली पोलिसांची कारवाई

दापोली तालुक्यात असलेल्या पालगडमध्ये एका व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब आढळून आले आहेत. दापोली पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

20 गावठी बॉम्ब जप्त
20 गावठी बॉम्ब जप्त

By

Published : Jun 16, 2023, 1:53 PM IST

Updated : Jun 16, 2023, 2:30 PM IST

20 गावठी बॉम्ब जप्त

रत्नागिरी :दापोली तालुक्यात असलेल्या पालगडमध्ये एका व्यक्तीकडून पोलिसांनी 20 गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी रमेश पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रमेश पवारला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

रॅकेट उघड होण्याची शक्यता :याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, दापोली पोलिसांनी दापोली तिट्यावर रमेश पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना या व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब मिळाले आहेत. एका पिशवीमध्ये या व्यक्तीने हे बॉम्ब ठेवले होते. पोलीस या आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली

याआधी सापडले होते बॉम्ब : दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते. त्यावेळी पोलिसांना या प्रकारची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दापोली विसापूर ते महाड रस्त्यावर सोनेरी विनेखिंडमधील गैल कंपनीच्या फलकाजवळ 5 जिवंत बॉम्ब सापडले होते. पोलिसांना गवतात सुपारीच्या आकाराच्या पिवळ्या रंगाचा त्यावर सुतळी दोरा गुंडाळलेले होते. बॉम्ब सापडल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी येथील श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथक व नाशपथकाला पाचारण केले होते. दरम्यान या बॉम्ब सापडल्याचा तपास अद्याप चालूच आहे. इतक्यात आज पुन्हा एकदा दापोलीत जिवंत बॉम्ब सापडले आहेत.

एका घरात आढळले होते बॉम्ब : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या भरणे नाका येथील एका व्यक्तीच्या घरात गावठी बॉम्बचा साठा मिळाला होता. वन्य प्राण्याच्या शिकारीसाठी या बॉम्बचा वापर केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यावेळी पोलिसांना 80 पेक्षा जास्त बॉम्ब आरोपीच्या घरी सापडले होते.

Last Updated : Jun 16, 2023, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details