रत्नागिरी- कोकणात थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी चांगलीच पडू लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं किमान तापमान आज १९ अंश सेल्सिअस होतं. तर मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील दापोलीचा पारा आणखीनच घसरला आहे. दापोलीचा पारा आज ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. त्यामुळे दापोली सध्या गारठली आहे.
दापोली गारठली
दापोलीचा पारा गेले काही दिवस घसरलेला आहे. गेल्या चार दिवसांचा दापोलीचा विचार केला तर २० तारखेला दापोलीचा पारा १२.५ अंश सेल्सिअस, २१ तारखेला १०.४ अंश सेल्सिअस, २२ तारखेला ८.९ अंश सेल्सिअस, २३ तारखेला ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत दापोलीचा पारा घसरला आहे.