रत्नागिरी -कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दापोली तालुक्यात एक रुग्ण पळून गेला होता. प्रशासनाने केलेल्या शोध मोहिमेमुळे अखेर तो रुग्ण सापडला. 16 तासानंतर या रुग्णाला शोधण्यात यश आले. त्यामुळे प्रशासन व ग्रामस्थांनी सुटकेचा नि: श्वास सोडला.
रत्नागिरी : दापोलीतील 'तो' पळालेला रुग्ण अखेर सापडला - रत्नागिरी कोरोना बातम्या
पळून गेलेली व्यक्ती जंगलातील एका पाणवठ्यावर पाणी पिऊन पुन्हा जंगलात पळत असे, शोध घेणाऱ्या पथकाच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी या पाणवठ्यावर लक्ष ठेवले आणि दुपारी ही व्यक्ती पाणी पिण्यास तेथे आल्यावर सर्वांनी त्याला घेरले आणि मग तो अखेर शरण आला.
दापोली तालुक्यात आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी रात्री आला होता. हा व्यक्ती दापोली तालुक्यातील बोरिवली येथील शाळेत विलगीकरण केलेला होता. त्या व्यक्तीला दापोली येथे आणण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी काल रात्री बोरिवली येथे गेली होती. या गाडीला पाहून मी लघुशंकेला जाऊन येतो, असे सांगून या कोरोनाबाधित व्यक्तीने तेथून पलायन केले. रात्रीपासून या व्यक्तीचा शोध प्रशासन तसेच ग्रामस्थांकडून घेण्यात येत होता. आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक पवार, त्यांचे सहकारी व पोलीस मित्र यांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला.
दरम्यान, पळून गेलेली व्यक्ती जंगलातील एका पाणवठ्यावर पाणी पिऊन पुन्हा जंगलात पळत असे, शोध घेणाऱ्या पथकाच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी या पाणवठ्यावर लक्ष ठेवले आणि दुपारी ही व्यक्ती पाणी पिण्यास तेथे आल्यावर सर्वांनी त्याला घेरले आणि तो व्यक्ती अखेर शरण आला. या व्यक्तीला सध्या दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.