रत्नागिरी - राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता राज्याच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीभागात चक्रीवादळाचे संकेत आहेत. त्यामुळे हवामान खात्याकडून सावधानता व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी भागात चक्रीवादळाचे सावट - cyclone threat
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीभागात चक्रीवादळाचे संकेत आहेत. त्यामुळे हवामान खात्याकडून सावधानता व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली होती. त्यात आज सकाळपासून कोकणातल्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण आहेत. काही भागात रिमझिम पाऊस पडला आहे. येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यात चक्रीवादळाचे संकटही घोंघावत आहे. त्यामुळे सध्या समुद्रात काळ्या ढगांची दाटीवाटी पहायला मिळतेय. या चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी सायंकाळपासून पहायला मिळाला. चक्रीवादळाच्या शक्यतेने किनारपट्टी भागात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही समुद्रात जाऊ नये, सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या भगवती बंदरातून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.