रत्नागिरी- जिल्ह्यासह राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जात आहे. शहरातही प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच श्री विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तब्बल 300 वर्षांहून अधिक जूनं हे मंदिर आहे.
आषाढी एकादशी : रत्नागिरीच्या प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
शहरातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच श्री विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. 300 वर्षांहून अधिक जूनं हे मंदिर आहे.
1718 मध्ये शंकरदास गोपाळदास गुजर यांनी हे मंदिर बांधले होते. त्यानंतर 1820 साली शंकरदास गुजर यांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर 1926 साली पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मंदिरात गेल्या तीनशे वर्षांपासून आषाढी एकादशीच्या उत्सवाची परंपरा सुरू आहे. 300 वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात आजही भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. अनेकांना पंढरपूरमध्ये जाणे शक्य होत नाही, असे अनेक भाविक या मंदिरात श्री विठ्ठलाच्या भेटीला येत असतात आणि विठूरायाच्या चरणी लीन होतात.