चिपळूण -रत्नागिरीत चिपळूणमध्ये महापुराचा फटका नदीतल्या मगरींना देखील बसला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीची पाणीपातळी वाढल्याने नद्यांमधील जलचरही पाण्याचा प्रवाह जाईल तिकडे जात आहेत. अशीच एक मगर पुराच्या पाण्यातून चक्क चिपळूण रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर आली होती.
महापुरामुळे चिपळूणच्या रेल्वे ट्रॅकवर मगर - रत्नागिरी चिपळूण
चिपळूणच्या महापुराचा फटका नदीतल्या मगरींना देखील बसला आहे. नदींच्या पाण्याची पातळी वाढल्याने नद्यांमधील जलचरही पाण्याचा प्रवाहासोबत इतरत्र जात आहेत. अशीच एक मगर पुराच्या पाण्यातून चक्क चिपळूण रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर आली होती.
वाशिष्ठी आणि शिव नदीची पाणीपातळी वाढल्याने नद्यांमधील जलचरही पाण्याचा प्रवाह जाईल तिकडे जात आहेत. एक महाकाय मगर चिपळूण रेल्वे स्टेशनवर आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याची माहिती तातडीने चिपळूण वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी रामदास खोत, किरण पाटील व प्रथमेश गावडे हे तिघेही तातडीने रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनी त्या मगरीला मोठ्या शिताफीने पकडून पिंजऱ्यात जेरबंद केलं. त्यानंतर त्या मगरीला सुखरूपरीत्या नैसर्गिक अधिवासात वन विभागाने सोडले. सध्या चिपळूणला पुराचा फटका बसला असून पाणी बाजारपेठांमध्ये शिरत आहे, त्यामुळे वाशिष्ठीच्या पात्रामध्ये असलेल्या मगरी ह्या मानविवस्तीत येत आहेत.