महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, दुसरा डोस घ्यायला येणाऱ्यांनाच फक्त मिळतेय लस - रत्नागिरी कोरोना बातमी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातही लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी लस घेतली होती, त्यांनाच आता लस देण्यात येत आहे. नव्याने लस घेण्यासाठी येणाऱ्यांना लस देण्यात येत नाही.

जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय

By

Published : Apr 8, 2021, 4:41 PM IST

Updated : Apr 8, 2021, 6:31 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा आहे. जिल्ह्याच्या आरोग्याचे मुख्य ठिकाण असलेल्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातही लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी लस घेतली होती, त्यांनाच आता लस देण्यात येत आहे. नव्याने लस घेण्यासाठी येणाऱ्यांना लस देण्यात येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी गेलेल्या अनेकांना खाली हात परतावे लागत आहे.

बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक
दुसरा डोस घ्यायला येणाऱ्यांनाच फक्त मिळतेय लस

कोरोनावरील लसीचा सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे म्हणाल्या की, बुधवारी (दि. 7 एप्रिल) जिल्ह्याला 1 हजार 100 डोस प्राप्त झाले. यातील 300 डोस जिल्हा रुग्णालयासाठी देण्यात आले. मात्र, ज्यांचे पहिले लसीकरण झाले आहे. त्यांना दुसरा डोस मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे सध्या दुसरा डोस घेणाऱ्यांचेच लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

पहिलाच डोस घ्यायला जाणाऱ्यांना लस न घेताच परतावे लागतेय

लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या अनेकांना लस न घेताच परतावे लागले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणे ग्रामिण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातही हिच परिस्थिती आहे. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत लसीचे डोस आल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा -दुकाने बंद करण्याच्या आदेशाविरोधात संतप्त व्यापाऱ्यांचा खेड नगर पालिकेच्या सभागृहात ठिय्या

हेही वाचा -निर्बंधांविरोधात रत्नागिरीतील व्यवसायिकांचे भीक मांगो आंदोलन

Last Updated : Apr 8, 2021, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details