महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणीचा विनयभंग करणार्‍याला अवघ्या ५ दिवसात न्यायालयाने ठोठावली शिक्षा - विनयभंग करणार्‍या तरूणाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

न्यायालयाच्या या निर्णयावर पोलिसांनीही समाधान व्यक्‍त केले आहे. हैद्राबाद येथील घटनेमुळे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत समाजामधून नाराजी व्यक्‍त होत असतानाच पाच दिवसात झालेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

ratnagiri crime
रत्नागिरी : तरूणीचा विनयभंग करणार्‍या तरूणाला अवघ्या पाच दिवसात न्यायालयाने ठोठावली शिक्षा

By

Published : Dec 7, 2019, 11:09 PM IST

रत्नागिरी - रात्रीच्या वेळी रस्त्यात गाडी आडवी लावून तरुणीचा विनयभंग करणार्‍या तरुणाला घटनेच्या अवघ्या पाच दिवसातच दोन वर्ष सक्‍तमजुरी आणि 20 हजार 500 रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. जी.जी. इटकळकर यांनी 'फास्ट ट्रॅक कोर्टा'प्रमाणे चालवलेल्या या खटल्यात ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर पोलिसांनीही समाधान व्यक्‍त केले आहे. हैद्राबाद येथील घटनेमुळे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत समाजामधून नाराजी व्यक्‍त होत असतानाच पाच दिवसात झालेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा -'जिओ'ला दे धक्का... एअरटेलकडून दुसऱ्या नेटवर्कवरील आउटगोईंग पुन्हा मोफत

तालुक्यातील पिरंदवणे वाडाजून येथे राहणारा तरुण प्रथमेश बाबूराव नागले (वय 24) याने 2 डिसेंबरला रात्री पावणे नऊच्या दरम्यान दुचाकीवरून जाणार्‍या तरुणीचा पाठलाग केला. रत्नागिरी शहरातील परटवणे येथून या तरुणीचा पाठलाग कतर प्रथमेशने बसणी-नेवरेकरवठार येथे तिच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावली. त्यानंतर तिच्याशी अश्‍लील संभाषण करीत, तरुणीचा हात धरला आणि माझ्या गाडीवर बसून चल, असे म्हणून तिला ओढू लागला. तिच्याशी अश्लील वर्तन केले.

हेही वाचा -अक्षय कुमार होणार पुन्हा भारताचा नागरिक, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

याप्रकरणी तरुणीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी प्रथमेश नागले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रध्दा बेर्डे यांनी प्रथमेशला 3 डिसेंबरला अटक केली. याप्रकरणी संपूर्ण तपास पूर्ण करून 4 डिसेंबरला दोषारोपपत्रासह प्रथमेशला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

हेही वाचा -अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता सरकारचे आर्थिक सुधारणांवर काम चालू

मुख्य न्यायदंडाधिकारी इटकळकर यांच्यासमोर 5 डिसेंबरला साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर 6 डिसेंबरला सरकारपक्ष आणि संशयिताच्यावतीने युक्‍तीवाद करण्यात आला. त्यानंतर शनिवारी 7 डिसेंबरला मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी निकाल देताना या प्रकरणात प्रथमेशने गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी सिध्द झाल्याने त्याला भादंवि कलम 354 अन्वये दोन वर्षे सक्‍तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, भादंवि कलम 354 (अ) (1) अन्वये एक वर्ष सक्‍तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तर कलम 341 अन्वये एक महिना साधी कैद आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा -गिरीष महाजनांना एकनाथ खडसेंचे सणसणीत उत्तर, म्हणाले...

ही शिक्षा एकाच वेळी भोगायची असून दंडाची रक्कम 20 हजार 500 रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एस. एस. वाघवणे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अनंत जाधव आणि मदतनीस म्हणून महिला पोलीस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.

ABOUT THE AUTHOR

...view details