रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. रविवारी ५६७ नवे रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० हजार २०० वर पोहचली आहे.
रविवारी ५६७ पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, ५६७ नव्या रुग्णांची भर
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. रविवारी ५६७ नवे रुग्ण आढळले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० हजार २०० वर पोहचली आहे.
रविवारी जिल्ह्यात विक्रमी तपासणी करण्यात आली आहे. ३ हजार २९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५६७ पॉझिटिव्ह तर २ हजार ७२४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार ४२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, आतापर्यंत एकूण ४० हजार २०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रविवारी ४२७ जण कोरोना मुक्त झाले. तर, आतापर्यंत ३४ हजार २१२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्या ४६३२ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
रविवारी दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या १३५६ झाली असून, मृत्यूचा दर ३.३७ टक्के झाला आहे.