रत्नागिरी -जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी लॅब उभारण्यासाठी 1 कोटी 7 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने केला असून लवकरच रत्नागिरीत अत्याधुनिक लॅब सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येत्या 15 दिवसांत ही लॅब सुरू झाल्यास कोरोना स्वॅब अहवाल रत्नागिरीतच मिळणे शक्य होणार आहे. ही लॅब जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात येईल. या लॅबमुळे भविष्यात रत्नागिरीत मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मार्ग देखील सुकर होणार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
15 दिवसांत जिल्ह्यात स्वॅब तपासणी लॅब : उदय सामंत
या लॅबमध्ये मलेरियापासून इतर साथीच्या रोगांची तपासणी देखील करता येणार आहे . त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी ही शासनाची यंत्रणा कायमची उपयोगात येणार आहे . तसेच, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे.
corona swab test
जिल्हा रुग्णालयात आधीच स्ट्रक्चर तयार आहे. त्यामुळे ही यंत्रणा उभारणे सोपे जाणार आहे. या लॅबमध्ये मलेरियापासून इतर साथीच्या रोगांची तपासणी देखील करता येणार आहे . तसेच, जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. म्हणून जिल्हा रुग्णालयात ही लॅब उभारण्याचे आम्ही निश्चित केले आहे . त्यासाठी 10 रुम तयार आहेत. याशिवाय, मायक्रोबायोलॉजिस्टही लागतो. तेही उपलब्ध करून दिले जाईल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.