रत्नागिरी - जिल्ह्यात महिनाभरापूर्वी शून्यावर आलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेच्या पलीकडे गेली आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 208 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी रात्री त्यामध्ये आणखी 12 जणांची भर पडली. नव्याने सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण आहेत. त्यातील तिघेजण मेगी गावातील आहेत. तर चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह आहेत. हे दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत. तर दापोली आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.