रत्नागिरी- जिल्ह्यात आज आणखी 18 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने आज सकाळी ही माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 287 वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. रविवारी सायंकाळी 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. तर सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
रत्नागिरीमध्ये आढळले नवे 18 रुग्ण ; एकूण कोरोनबाधितांची संख्या 287 - Ratnagiri Corona Latest News
जिल्ह्यात आज आणखी 18 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने आज सकाळी ही माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 287 वर गेली आहे.
नवीन रुग्णांपैकी रत्नागिरी 7 , कळंबणी 8 , गुहागर 1 , राजापूर येथील 2 रुग्ण आहेत. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 100 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण 178 आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे.
तालुकानिहाय आकडेवारी - मंडणगड - 23, रुग्णदापोली - 26 ,रुग्णसंगमेश्वर - 35, रुग्णखेड - 36, रुग्णगुहागर - 22, चिपळूण - 41 ,राजापूर - 21, लांजा - 5,