रत्नागिरी -कोरोनाग्रस्त रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. चिपळूणमधील कामथे येथील शासकीय रुग्णालयात या कोरोनाग्रस्ताने मध्यरात्री 12 ते 12.15 च्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या - ratnigiri latest news
एका कोरोनाग्रस्ताने रुग्णालयाच्या गच्चीवर जात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना कामथे येथील शासकीय रुग्णालयात घडली आहे. यामुळे इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे.
file photo
आंबडस येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला 6 ऑगस्टला कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 ऑगस्टला या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची प्रकृतीही सुधारली होती. रविवारी (दि. 16 ऑगस्ट) त्याला डिस्चार्जही मिळणार होता. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या गच्चीवर जात या रुग्णाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
कोरोनाच्या भितीने या रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या रुग्णाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे.