रत्नागिरी- सध्या देशभर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे या अडचणीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 20 एप्रिलला ओखा वरून सुटलेली ही ट्रेन आज रत्नागिरीत दाखल झाली होती. सकाळी 11 वाजता हे स्पेशल ट्रेन रत्नागिरीत आली. या ट्रेनने रत्नागिरीत औषधं आणण्यात आली. त्यानंतर ही ट्रेन सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये, म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात होता. सोमवारी ही पार्सल ट्रेन ओखावरून निघाली. ही ट्रेन आज मंगळवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतल्या मेडिकलसाठी आणला गेला. रत्नागिरीत हा माल या पार्सल ट्रेनमधून उतरविण्यात आला.