रत्नागिरी- दोन कंटेनरची समोरासमोर धडक लागून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात झाला. या अपघातात एका कंटेनरमधील चालक जखमी झाला असून त्याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर चालकाची सुटका करण्यात आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्वरत झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची समोरासमोर धडक, एक जखमी
दोन कंटेनरची समोरासमोर धडक लागून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरची समोरासमोर धडक
हेही वाचा - तिवरे धरण फुटीग्रस्तांचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाच्या जागेत,५६ कुटुंबियासाठी होणार वसाहतीची उभारणी
मुंबई गोवा महामार्गावर सकाळी मुंबई कडून कोकणात जाणारा आणि कोकणातून मुंबईच्या दिशेने येणारे कंटेनर कशेडी घाटात आले. त्यावेळी कशेडी घाटात वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनरची समोरासमोर धडक बसली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे.
Last Updated : Nov 20, 2019, 11:18 AM IST