रत्नागिरी -येथील मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात झाला होता. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ घडली. अपघातानंतर ठप्प झालेली वाहतूक तीन तासानंतर पूर्ववत झाली आहे. हा कंटेनर रस्त्यातून हटविण्यात यश आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरला अपघात; तीन तासांनंतर वाहतूक पूर्ववत
मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवारी) सकाळी एका कंटेनरचा अपघात झाला होता. लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ हा अपघात झाला होता. सुदैवाने मोठा अपघात टळला तसेच कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. मात्र, रस्त्याच्या मध्येच कंटेनर फसला होता.
कंटेनर अपघात रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवारी) सकाळी एका कंटेनरचा अपघात झाला होता. लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळ हा अपघात झाला होता. सुदैवाने मोठा अपघात टळला तसेच कोणतीही जीवितहानी या अपघातात झाली नाही. मात्र, रस्त्याच्यामध्ये कंटेनर फसला होता. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त कंटेनर हटविण्याचे प्रयत्न सकाळपासून सुरू होते. अखेर तीन तासानंतर हा रस्त्यातून हा कंटेनर हलविण्यात यश आले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
Last Updated : Jul 24, 2020, 2:24 PM IST