महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री जमिनीवर तरी उतरले, पंतप्रधान उतरले का? - नाना पटोले - नरेद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान

महाराष्ट्रावर पंतप्रधानांचे प्रेम आहे, केंद्राच्या तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवाय ते आमच्या अधिकाराचे पैसे आहेत भिक नाही, अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

नाना पटोले
नाना पटोले रत्नागिरीत पाहणी दौऱ्यावेळी

By

Published : May 23, 2021, 1:23 PM IST

रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी दौऱ्यात चोख प्रत्युत्तर दिले आहे. तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जमिनीवर उतरले होते. मात्र फक्त गुजरातमध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर तरी उतरले का? याचा शोध घ्यावा, मग टीका करणाऱ्यांना याचे उत्तर मिळेल, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री जमिनीवर तरी उतरले, पंतप्रधान उतरले का? - नाना पटोले
गुजरातचेच पंतप्रधान असल्याचे नरेंद्र मोदींनी सिद्ध केले-गुजरातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीवरून नाना पटोले यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे. आपण गुजरातचेच पंतप्रधान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असा टोला पटोले यांनी यावेळी लगावला. दरम्यान महाराष्ट्रावर पंतप्रधानांचे प्रेम आहे, केंद्राच्या तिजोरीत टॅक्स स्वरूपात जो पैसा जातो, त्यातला 40 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. आज राज्यातील जनता अडचणीत आहे, अशा वेळेस केंद्राने भरीव मदत करावी, त्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राला 2 हजार कोटी तरी मदत करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवाय ते आमच्या अधिकाराचे पैसे आहेत भिक नाही, अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details