महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात - ashok chavan

काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि रत्नागिरी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर यांचे नाव चर्चेत आहे. किर यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. अद्याप आपल्याला काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही संपर्क झाला नसल्याचे कीर यानी म्हटले आहे.

बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात

By

Published : Mar 23, 2019, 8:22 AM IST

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे. सनातन या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपांवरून बांदिवडेकर अडचणीत आले आहेत. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बांदिवडेकराना मुंबईत बोलावले असल्याचे समजते.

बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात

दुसरीकडे पर्यायी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि रत्नागिरी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर यांचे नाव चर्चेत आहे. किर यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. अद्याप आपल्याला काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही संपर्क झाला नसल्याचे कीर यानी म्हटले आहे. कीर हे १९९८ पासून काँग्रेसच्या सक्रीय राजकारणात असून ते दोनवेळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ५ वर्षे MTDC चे संचालक रहिले आहेत. दरम्यान चव्हाण- बांदिवडेकर यांच्या भेटीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details