महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची राजापूरमध्ये मोठी कारवाई - Ratnagiri crime story

गोवा बनावटी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्यातील वाटुळ येथून जप्त केला आहे. यावेळी तब्बल १ कोटी ६० लाख ८० हजार रु.चा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

By

Published : Apr 29, 2021, 8:26 AM IST

रत्नागिरी -गोवा बनावटी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्यातील वाटुळ येथून जप्त केला आहे. १ कोटी ६० लाख ८० हजार रु.चा दारूसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. तर कंटेनर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद अब्दुल इझात (वय ४७, राहणार कसारारोड) याला अटक करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची राजापूरमध्ये मोठी कारवाई

लाखोंचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक डॉ. व्ही.एच तडवी हे बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत असताना, गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कंटेनर संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी टाटा कंपनीचा कंटेनर (क्र.एम एच १२ एलटी ७८३५) याला तपासणीसाठी थांबवले. यावेळी कंटेरनमध्ये रॉयल ब्लू विस्कीच्या एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे १८०० बॉक्समध्ये ८६ हजार ४०० बॉटल तर दुसर्या ४०० बॉक्समध्ये ४८०० बाटल्या असा १ कोटी ६० लाख ८० हजार रु.चा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर कंटेनर, मोबाइल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लॉकडाऊन कालावधीत सर्वातमोठी कारवाई
प्रभारी अधीक्षक डॉ. व्हि.एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुधीर भागवत, वाहन चालक संदीप विटेकर, जगदीश गोताड, दिनेश माने, रोहित देसाई, साजिद शहा यांनी ही कारवाई केली, तर या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक अमित पाडळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाने सर्वात मोठी कारवाई केेली आहे.

हेही वाचा -१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस, १ मे रोजी नव्हे 'या'वेळी सुरू होईल लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details