रत्नागिरी - राज्यात मान्सूनची आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र, सद्या पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रत्नागिरीत तौत्के चकीवादळानंतर काही भागात खरीपाच्या पेरण्याही करण्यात आल्या आहेत. आता अधूनमधून पडणाऱ्या वादळी पावसाने सुखावलेल्या बळीराजाची खरीपाची लगबग सुरू झालेली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात बरसलेल्या जोरदार सरींमुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शेतीच्या कामांना सुरुवात
राज्यात मान्सूनची आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र, सद्या पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रत्नागिरीत तौत्के चकीवादळानंतर काही भागात खरीपाच्या पेरण्याही करण्यात आल्या आहेत. आता अधूनमधून पडणाऱ्या वादळी पावसाने सुखावलेल्या बळीराजाची खरीपाची लगबग सुरू झालेली आहे.
शेतीच्या कामाला वेग
कोकणात मुख्यत्वे भातशेती केली जाते. जवळपास 75 हजार हेक्टर जमीन ही भातशेतीने व्यापलेली आहे. रोहीणी नक्षत्राच्या मुहूर्तावर याठिकाणी पिकाची पेरणी केली जाते.
सध्या कोकण किनारपट्टीला 'तौत्के' वादळाने तडाखा दिला. या वादळाबरोबरच जिल्हाभरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या वादळामुळे नुकसान झाले आहे. मात्र, या पावसाने शेतजमीन पुरती ओली झाली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी वादळाने झालेले नुकसान विसरून आता भातशेतीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. एकीकडे दुपारपर्यंत वाढलेला उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे सायंकाळनंतर आभाळ दाटून येत पूर्वमोसमी पावसाच्या सरी ठिकठिकाणी कोसळत आहेत. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आल्याचं चित्र आहे.