रत्नागिरी- समुद्राला भरती आल्याने उंचच उंच लाटा उसळल्या. या लाटांनी समुद्र किनाऱ्यावरील नारळाचे झाड गिळंकृत केले. किनारपट्टीच्या बाजूच्या संरक्षक भिंतींचे नुकसान झाले आहे.
अजस्त्र लाटांनी गिळंकृत केले नारळाचे झाड; मानवी वस्तीत शिरले समुद्राचे पाणी
भरतीमुळे समुद्रात साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांमुळे किनाऱ्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.
कोसळलेले नारळाचे झाड
भरतीमुळे समुद्राचे पाणी किनारी भागात आले होते. यावेळी समुद्रात साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांमुळे किनाऱ्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.
रत्नागिरीमधील पंधरामाड परिसरात असणाऱ्या संरक्षक बंधाऱ्यावरुन पाणी मानवी वस्तीत आले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. समुद्राच्या उसळलेल्या लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.