रत्नागिरी- जिल्हा पोलीस दलाकडून निरोगी आरोग्याचा मंत्र आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आज (शनिवार) रत्नागिरी शहरात जिल्हास्तरीय 'कोस्टल मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये साडे तीन हजारहून अधिक रत्नागिरीकर पोलिसांसोबत धावले. दरम्यान, 'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' ब्रीद वाक्य असलेल्या या स्पर्धेतून एकतेचा संदेश देण्यात आला.
आज सकाळी ६ वाजता मारुती मंदिर येथून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी चीफ एअर मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, या मॅरेथॉनची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा या नृत्य प्रकारच्या तालावर वॉर्मअप करण्यात आला.
'कोस्टल मॅरेथॉन'द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, लहान मुले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' या मॅरेथॉन स्पर्धत ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर असे एकूण चार गट करण्यात आले होते. तर ३ किलोमीटर हे ड्रीम रन म्हणून ठेवण्यात आले होते. यामध्ये नोंदणी न केलेले नागरिक तसेच आयत्यावेळी कोणीही सहभागी होऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले होते.
रत्नागिरी कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभात विजेत्यांपेक्षा ७५ वर्षीय जेष्ठ नागरिक वसंत हरी कर्लेकर यांचीच चर्चा जास्त रंगली. वसंत यांनी तब्बल २१ किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. या वयात देखील त्यांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल ते विशेष कौतुकास पात्र ठरले.
हे आहेत कोस्टल मॅरेथॉनचे विजेते -
- २१ किलोमीटर पुरुष गटात
- १ ) अविनाश पवार (१ तास १७ मिनिट ५० सेकंद)
- २) अक्षय पडवळ (१ तास २२ मिनिट ०८ सेकंद)
- ३) रोहित बडदे (१ तास २६ मिनिट १५ सेकंद)
- २१ किलोमीटर महिला गटात
१) शर्मिला कदम (१ तास ५० मिनिट ०१ सेकंद)
२) प्रिया संदीप शिंदे (१ तास ५१ मिनिट ३५ सेकंद) - १० किलोमीटर पुरुष गट
१) मयूर चांदवडे (३५ मिनिटे २५ सेंकद)
२) सिद्धेश भुवड (३६ मिनिटे)
३) सिद्धेश कानसे (३७ मिनिटे ३४ सेंकद) - १० किलोमीटर महिला गट
१) दिव्या बोरे (४७ मिनिटे १९ सेंकद)
२) सीमा मोरे (५३ मिनिटे ०३ सेंकद)
३) दर्शना शिंदे (५२ मिनिटे ४२ सेंकद) - ५ किलोमीटर ड्रीम रन पुरुष गट
१) संकेत भुवड (१८ मिनिटे १० सेंकद)
२) सोहम पवार (१८ मिनिटे १५ सेंकद)
३) प्रथमेश उदेग (१८ मिनिटे ५८ सेंकद) - ५ किलोमीटर महिला गट
१) रोहिणी पवार (२९ मिनिटे)
२) श्रुती गीजबीले (३१ मिनिटे २० सेंकद)
३) विद्या चव्हाण (३४ मिनिटे ४० सेंकद) - ३ किलोमीटर मुले गट
१) रुद्र सदावर्ते
२) किरण राजमाली
३) शयान गावकर - ३ किलोमीटर मुली गट
१) स्वरांजली कर्लेकर
२) सानिका काळे
३) त्रिशा मयेकर