रत्नागिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या बंगला पाडण्याचे काम सुरू झाले आहे. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला हा बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांची ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली.
तसेच २३ ऑगस्टला मी दापोलीला जावून प्रत्यक्ष या तोडकामाची पाहणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असेल, असेही ते म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक -
मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याच्या बांधकामाविरोधात केंद्रीय ग्रीन ट्रिब्युनरमध्ये भाजप नेते किरीट सोमैया यांनी याचिका दाखल केली होती. नार्वेकर यांच्या बंगल्याचे सुरू असलेले हे बांधकाम तोडण्यात यावे, अशी मागणी सोमैया यांनी केली होती. सोमैया मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील बंगल्याची त्यांनी यावेळी पाहणी केली होती.
हेही वाचा -'एकनाथ शिंदे शिवसेनेचा 'खंबीर खांब', सच्च्या शिवसैनिकाची बदनामी करण्याचे राणेंकडून काम'