महाराष्ट्र

maharashtra

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम; कोकणात सुरू असलेल्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By

Published : Sep 25, 2020, 10:08 PM IST

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोकणात सुरू असलेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी
रत्नागिरी

रत्नागिरी - कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असून यात प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आताची जीवनशैली अंगीकारणे गरजेच आहे. मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे या त्रिसुत्रीची अमंलबजावणी भविष्यातही सुरू ठेवणे गरजेचे आहे. ही गोष्ट सर्वसामान्य जनतेत बिंबवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महत्त्वाकांक्षी मोहिमेत कोकणात सुरू असलेल्या कामांचा आढावा मुख्यमंत्री महोदयांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बैठकीतील दृश्य

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी रत्नागिरी जिल्ह्याचाही आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हा परिषद रत्नागिरीच्या, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदि संबधित जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहातून या व्हीसीला उपस्थित होते. तसेच पालकमंत्री ॲड अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही ऑनलाइन या व्हीसीला उपस्थित होते.

हेही वाचा -नाणार जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नातेवाईक, निलेश राणेंचा खळबळजनक आरोप

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून काल अखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे. यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे. 37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली.

कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 065 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी 7 हजार 425 पथकांची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आली आहेत. दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. आज अखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते. भेटी दरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृष्य आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमीटर आवश्यक आहेत. त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या मोहिमेत ६७७ पथके काम करत असून आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 32 टक्के लोकांची तपासणी केली आहे. मोहिमेमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी चांगला सहभाग घेतला असून आशा सेविका, शिक्षक यामध्ये काम करत आहेत. जिल्ह्यात पाऊस असल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आशा सेविका, शिक्षक आदि संबधित यांना टि-शर्ट, कॅप सोबत रेनकोटही पुरविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

हेही वाचा -राणेंना कवडीची किंमत देत नाही..; रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ

कुटुंबांच्या तपासणी दरम्यान लक्षणे आढळलेल्या नागरिकांसाठी फिवर क्लीनिक सुरू करण्यात आली आहेत. यात प्रत्येक रुग्णाची अथवा लक्षणे असलेल्या व्यक्तीची पूर्ण तपासणी झाल्या खेरीज त्याला घरी जाऊ देण्याऐवजी विलगीकरणात ठेवण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

या मोहिमेंच्या प्रभावी अमलबजावणी च्या अनुषंगाने त्याची व्यापक प्रसिध्दी होण्यासाठी जिल्हयामध्ये कुटुंबाची साथ कोरोनावर मात या घोषवाक्यास अनुसरून शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा, गाणी, नाटीका, एकपात्री व्हिडीओ स्पर्धा, पोस्टर्स/रांगोळी स्पर्धा, दिपोत्सव, निबंध स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, फेसबुक लाईव्ह, गुढी महोत्सव, उत्कृष्ट व्हिडीओ/फोटोज् ना युटयुबवर प्रसिध्दी देणे, पोस्टर/स्टिकर लावणे, होर्डींग लावणे आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच यु-टयुब, फेसबुक लाईव्ह, व्टिटर यांसारख्या समाजमाध्यमांचा वापरही या मोहिमेत करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details