महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेची पत्रकार परिषद रद्द; प्रशासकीय कामासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीतून तातडीने मुंबईकडे रवाना - MAHAJANDESH YATRA

महाजनादेश यात्रेची रत्नागिरीत होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी विमानतळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत महत्वाच्या बैठकीसाठी जावं लागत असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली नसल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 18, 2019, 12:20 PM IST

Updated : Sep 18, 2019, 1:04 PM IST

रत्नागिरी -मुख्यमंत्र्यांची महजानदेश यात्रा मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली. त्यानंतर आज(बुधवारी ) मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार असल्याचे यापूर्वीच भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, आज पत्रकार परिषद न घेताच मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले आहेत.

महाजनादेश यात्रेची पत्रकार परिषद रद्द

महाजनादेश यात्रेची रत्नागिरीत होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास रत्नागिरी विमानतळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत महत्वाच्या बैठकीसाठी जावं लागत असल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली नसल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस प्रशासकीय काम आणि पक्षाच्या कामासाठी तातडीने मुंबईकडे रवाना झाले असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले.

Last Updated : Sep 18, 2019, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details