रत्नागिरी- मुंबई आणि पुणेहून येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये विनापरवानगी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ही वाढणारी संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्याएवढी आरोग्य यंत्रणाही उपलब्ध नाही. परिस्थिती आता जिल्हा प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे, म्हणून प्राथमिकदृष्ट्या दापोली, मंडणगड येथे सर्वांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तरुणांचे वाडी कृती दल तयार करण्यात आले आहे.
दापोली, मंडणगड येथे होणार प्रवाशांचे विलगीकरण; वाडी कृती दल ठेवेल लक्ष - collector laxminarayan mishra lockdown
वाडी कृती दलातील तरुण जिल्ह्या बाहेरून येणारे नागरिक ज्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवतील. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे उपयोग केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
वाडी कृती दलातील तरुण जिल्ह्या बाहेरून येणारे नागरिक ज्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवतील. हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे उपयोग केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. शिवाय, जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठा उघडण्याबाबतचे अधिकार देखील प्रांताधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
हेही वाचा-सचिन सावंतांची पक्षाविरोधात जाहीर नाराजी..! ट्वीटरवरून काँग्रेस प्रवक्तेपद हटवले