महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' कारणामुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघ आहे चर्चेत - चिपळूण विधानसभा मतदारसंघ

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण असा मतदारसंघ आहे, जिथे सर्वात कमी उमेदवार आहेत. चिपळूण मतदारसंघातून फक्त तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चिपळूण विधानसभा मतदारसंघ

By

Published : Oct 10, 2019, 11:40 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. चिपळूण मतदारसंघातून फक्त तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण असा मतदारसंघ आहे, जिथे सर्वात कमी उमेदवार आहेत.

चिपळूण मतदारसंघातून फक्त तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


चिपळूणमधून सदानंद नारायण चव्हाण (शिवसेना), शेखर गोविंदराव निकम(राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन लक्ष्मण मोहिते (बहुजन समाज पार्टी) असे फक्त तीन उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात आजपर्यंत 2014 साली सर्वाधिक 10 उमेदवारांमध्ये लढत झाली होती. 1972 च्या निवडणुकीत सर्वात कमी 2 उमेदवारांमध्ये लढत झाली होती.

हेही वाचा - सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड


जास्त उमेदवार निवडणुकीसाठी असले कि, मतं विभागली जातात. त्यामुळे तुल्यबळ उमेदवारांनाही धोका असतो. यावेळी चिपळूण मतदारसंघात कोणता उमेदवार किती मते घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कमी उमेदवार असल्याने आपल्याला ही निवडणूक सोपी जाईल. नक्की विजयाचा हार माझ्याच गळ्यात पडेल, याची खात्री असल्याचे शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांनी म्हटले आहे. उमेदवार कमी असो वा जास्त, लढत ही लढत असते, पण सध्या आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहता ही लढत निश्चित आपणच जिंकू असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघात 1962 ते 2014 दरम्यानच्या उमेदवारांची संख्या -

1962 - 4 उमेदवार
1967 - 4 उमेदवार
1972 - 2 उमेदवार
1978 - 4 उमेदवार
1980 - 4 उमेदवार
1985 - 6 उमेदवार
1990 - 4 उमेदवार
1995 - 7 उमेदवार
1999 - 4 उमेदवार
2004 - 6 उमेदवार
2009 - 6 उमेदवार
2014 - 10 उमेदवार

ABOUT THE AUTHOR

...view details