चिपळूण (रत्नागिरी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 'राजगृह' या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा चिपळून वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच डॉ. बाबासाहेबांच्या कुटुंबियांना कायमस्वरुपी झेड सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान हे तमाम वंचित बहुजनांचे एक प्रेरणास्थान आहे. राजगृह हे आमची अस्मिता आहे. राजगृहाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करु नये, असा धमकी वजा इशारा भारिप, वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. चिपळूणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर बहुजन वर्गातील कार्यकर्त्यानी घोषणा देत या घटनेचा निषेध केला.