रत्नागिरी - लॉकडाऊनशिवाय मुख्यमंत्र्यांना काही दिसत नाही आणि काही कळतही नाही, यांचा पहिला उपाय पण लॉकडाऊन, मधला उपाय लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॉकडाऊन, त्यामुळे यांनी मातोश्रीचं नाव बदलून लॉकडाऊन करून टाकावं, असा टोला भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. रत्नागिरीत आज त्यांच्या रायगड या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीचं नाव बदलून लॉकडाऊन ठेवावं - निलेश राणे - Nilesh Rane news
लॉकडाऊनशिवाय मुख्यमंत्र्यांना काही दिसत नाही आणि काही कळतही नाही, यांचा पहिला उपाय पण लॉकडाऊन, मधला उपाय लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॉकडाऊन, त्यामुळे यांनी मातोश्रीचं नाव बदलून लॉकडाऊन करून टाकावं असा टोला भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा विषय म्हणजे लॉकडाऊन, ते बेरोजगारीवर काही बोलत नाहीत, व्यापारी रस्त्यावर आहेत. रिक्षा, बस, टॅक्सी चालू आहेत. पण गार्डन बंद, ऑफिसेस बंद, दुकानं बंद आहेत मग लोकं जाणार कुठे?
मुख्यमंत्र्यांना राज्य चालवणं जमत नाही
महाराष्ट्रात जेवढे मृत्यू एका वर्षात अपघाताने होतात. त्याच्या पेक्षा कमी कोरोनाने होतात. मग अपघात होतात म्हणून रस्ते बंद कराल, की शोरूममधून गाड्या विकत घेणं बंद कराल, असा सवालही निलेश राणे केला आहे. मुख्यमंत्र्यांना राज्य चालवणं जमत नाही, राज्य हे अधोगतीकडे चाललं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे जर आत्ताच थांबवलं नाही, तर महाराष्ट्रात भयानक परिस्थिती उभी राहील. लोकंच आता म्हणायला लागली आहेत. कोरोना जाऊद्या आम्ही भुकेने मरू, तुम्ही काही देऊ नका आमचं आम्हाला कमवू द्या, ही आज परिस्थिती असल्याचं सांगत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा-कोरोनाची लस, व्हेंटिलेटर देण्यात महाराष्ट्राबरोबर केंद्राचा दुजाभाव, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप