महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बर्ड फ्लूची धास्ती : चिकन सेंटरकडे खवय्यांची पाठ, व्यवसायिक हवालदिल - चिकनचे दर घसरले न्यूज

नेहमी चिकन सेंटरवर दिसणारी खवय्यांची गर्दी बर्ड फ्लूच्या भीतीने मात्र ओसरल्याचं चित्र आहे. जवळपास ६० ते ७० टक्के यामुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे.

chicken prices decline due to bird flu in ratnagiri
बर्ड फ्लूची धास्ती : चिकन सेंटरकडे खवय्यांची पाठ, व्यवसायिक हवालदिल

By

Published : Jan 17, 2021, 12:10 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरविल्याने साहजिकच सध्या त्याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. नेहमी चिकन सेंटरवर दिसणारी खवय्यांची गर्दी बर्ड फ्लूच्या भीतीने मात्र ओसरल्याचं चित्र आहे. जवळपास ६० ते ७० टक्के यामुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकन व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.

चिकन व्यवसायिक माहिती देताना...
चिकन व्यवसायावर परिणाम१५ डिसेंबर २०२० ला मार्गशीर्ष महिना सुरू झाला. १४ जानेवारी २०२१ ला मार्गशीर्ष संपला. दरम्यानच्या काळात अनेक खवय्यांनी आपल्या जिभेवर संयम ठेवून गेले महिनाभर मांसाहार टाळला होता. मार्गशीर्ष कधी संपतो आणि चिकनवर कधी ताव मारतो, असे अनेकांना झाले होते . याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार ऐन जोमात सुरू आहे . कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी काहीजणांनी निवडणूक काळात व मार्गशीर्ष संपल्यानंतर मांसाहाराचा बेत आखला होता ; मात्र या सर्व बाबींवर बर्ड फ्लूच्या दापोलीतील शिरकावामुळे सर्वांच्याच उत्साहावर पाणी फेरले. त्यामुळे अनेकजण सध्या चिकन खाणं टाळत आहेत. याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. कारण गिऱ्हाईक नाही, आहे तो माल संपत नाही. त्यामुळे कोंबड्यांचा खाद्याचा खर्च वाढतो. त्यात चिकनचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे चिकन व्यवसायिक पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी अफवेमुळे बसला फटका, यंदा बर्ड प्लूचा फटकागेल्यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात मोठा फटका चिकन व्यावसायिकांना बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, अशी अफवाही सुरवातीच्या काळात पसरली आणि या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय पुरता कोलमडला. पोल्ट्री धारकांनी रोगाच्या भीतीने पोल्ट्रीमधील जिवंत कोंबड्या पुरून टाकल्या होत्या, तर काहींनी फुकट तर काहींनी स्कीम लावून कमी किमतीमध्ये कोंबड्या विकल्या. मात्र ही अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. यातून आता सावरत असतानाच आता वर्षाच्या प्रारंभीच बर्ड फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पोल्ट्री उद्योगापुढे भीती निर्माण झाली आहे. यामुळे चिकन उद्योग मात्र पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details