महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, जनजागृतीसाठी रत्नागिरीत रंगला 'चिकन महोत्सव' - Ratnagiri Chicken Festival News

बर्ड फ्ल्यूचा राज्यात शिरकाव झाल्याने अनेकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकन व्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र, चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, याच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने आज रत्नागिरीत चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना चिकन लॉलीपॉप तसेच अंडी खाण्यास देण्यात आली.

रत्नागिरी चिकन महोत्सव न्यूज
रत्नागिरी चिकन महोत्सव न्यूज

By

Published : Jan 29, 2021, 4:13 PM IST

रत्नागिरी -बर्ड फ्ल्यूचा राज्यात शिरकाव झाल्याने अनेकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकन व्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र, चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, याच्या जनजागृतीसाठी रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने आज रत्नागिरीत चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना चिकन लॉलीपॉप तसेच अंडी खाण्यास देण्यात आली.

रत्नागिरीत चिकन महोत्सव
चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, जनजागृतीसाठी रत्नागिरीत रंगला 'चिकन महोत्सव'

हेही वाचा -लॉकडाऊनमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ, ठाण्याच्या मेंटल रुग्णालयात पुन्हा भरती

बर्ड फ्ल्यूमुळे चिकनकडे खवय्यांची पाठ

राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला, त्यानंतर जिल्ह्यातही काही पक्षांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झालेला नाही. पण तरीही भीतीपोटी अनेकजण सध्या चिकन खाणे टाळत आहेत. याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. कारण गिऱ्हाईक नाही, आहे तो माल संपत नाही. त्यामुळे कोंबड्यांचा खाद्याचा खर्च वाढतो. त्यात चिकनचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे चिकन व्यवसायिक पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मात्र, चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होत नाही, हे सांगण्यासाठी प्रशासन स्तरावरही प्रयत्न केले जाताहेत.

रत्नागिरीत चिकन महोत्सव
रत्नागिरीत चिकन महोत्सव
जनजागृतीसाठी चिकन महोत्सव

जनजागृतीचा एक भाग म्हणून आज रत्नागिरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिकन लाॅलीपाॅप आणि अंडी या महोत्सवासाठी आलेल्या लोकांना मोफत खाण्यासाठी देण्यात आली. या महोत्सवात आलेल्या लोकांनी चिकन लाॅलीपाॅपवर ताव मारला. यावेळी चिकन खाण्यासाठी आलेल्या लोकांचे प्रबोधनसुद्धा करण्यात आले.


हेही वाचा -राष्ट्रीय युद्ध स्मारक दक्षिण कमांडचे नूतनीकरण पूर्ण, नागरिकासाठी खुले

ABOUT THE AUTHOR

...view details