रत्नागिरी -पावसाळ्यातील कोकणातले सौंदर्य पाहण्यासाठी तुफान गर्दी सध्या रत्नागिरीत झाली आहे. येथील पडीक जमिनीवरील फुलांचा बहर पाहून मन मोहून जाते. विविध रंगीबेरंगी फुलांचे ताटवेच्या-ताटवे सध्या कोकणातल्या अनेक कातळावर पाहायला मिळत आहेत. तब्बल दोनशे फुलांच्या विविध छटा सध्या कातळभूमीत पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा - गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग
साताऱ्यातील कास पठारावर निळ्या, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या कास पुष्पांनी पर्यटनला एक नवी दिशा मिळवून दिली, तशाच पद्धतीचे रत्नागिरी-शिरगाव येथील पठारावर दृश्य पहायला मिळत आहे. शिरगावप्रमाणे राजापूरमधील देवीहसोळ, अडिवरे, गुहागरमधील वेळणेश्वर, वाडदई, मासू, हेदवी, काजुर्ली, दापोलीमधील दाभोळ, खेर्डी, चिपळूणच्या मार्गे ताम्हाणे, संगमेश्वरचा घोडवली या भागात विलोभनीय दृष्य सध्या पाहावयास मिळत आहेत.