रत्नागिरी -जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. मात्र, कालपासून सलग पावसाला सुरुवात झाली आहे.
मुसळधार पावसामुळे चांदेराई-लांजा रस्ता पाण्याखाली; वाहतूक ठप्प - चांदेराई-लांजा वाहतूक ठप्प
सततच्या पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चांदेराई-लांजा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. रस्त्यावर जवळपास 2 ते 3 फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई-लांजा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
सततच्या पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चांदेराई-लांजा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. रस्त्यावर जवळपास 2 ते 3 फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई-लांजा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तर हरचेरी बाजारपेठेतही पाणी भरण्याची शक्यता आहे. या भागातील व्यापाऱ्यांनी सामानाची हलवाहलव करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 4, 5 व 6 ऑगस्टला मुंबई, पालघर, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.